वाशिम - शहरातील अल्लाडा प्लांट परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह विहिरीत सापडल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
वाशिममधील हरवलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडला विहिरीत - हरवलेल्या मुलीचा मृतदेह मिळाला विहिरीत वाशिम न्यूूु्ज
वाशिममध्ये हरवलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह विहिरीत सापडल्याची घटना उघडकीस आली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
missing girl dead body found in well
हेही वाचा - व्याजाचे पैसे न दिल्याने सावकाराने तरुणाला पाच महिने ठेवले काळकोठडीत
भाग्यश्री कंकाळ असे मृत मुलीचे नाव आहे. अज्ञात व्यक्तीने तिला पळवून नेल्याची तिच्या नातेवाईकांनी बुधवारी वाशिम शहर पोलिसांत तक्रार केली होती. मात्र शुक्रवारी दुपारच्या सुमारास तिचा मृतदेह परिसरातील विहिरीत आढळुन आला.दरम्यान, पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. भाग्यश्रीच्या मृत्यूचे कारण मात्र समजू शकले नाही. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.