वाशिम -भाजपाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून शहरातील विविध रुग्णालयाला १० ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मशीनचे वितरण करण्यात आले. मतदार संघाचे आमदार लखन मलीक व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मशीन शहरातील विविध रुग्णालयाच्या प्रशासनाला सुपुर्द करण्यात आले.
वाशिममध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून विविध रुग्णालयांना ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मशीन भेट - ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर
ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मशीन मिळालेल्या रुग्णालयामध्ये डॉ. हरिष बाहेती यांचे मॉ गंगा मेमोरीयल रुग्णालय, डॉ. अमित राठी यांचे महेश क्रिटीकल केअर, डॉ. अंकीत बजाज यांचे बजाज क्रिटीकल केअर, डॉ. प्रविण ठाकरे यांचे नाथ रुग्णालय, डॉ. चंद्रकांत घुगे यांचे घुगे रुग्णालय, डॉ. संतोष काकडे यांचे काकडे क्रिटीकल केअर, डॉ. ढोबळे यांचे ढोबळे रुग्णालय, या रुग्णालयाचा समावेश आहे.
वाशिम रुग्णालय