वाशीम - जिल्ह्यातील जऊळका येथे रात्री 3 वाजेच्या सुमारास शेतकरी शरद रवणे यांच्या घराला भीषण आग लागल्याची घटना घडली होती. याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले, मात्र या आगीने रौद्र रूप धारण केले असल्याने आगीवर नियंत्रण मिळू शकले नाही. या आगीचे भीषण रूप पाहता गावकऱ्यांनी या घटनेची माहिती मालेगाव नगर पंचायतच्या अग्निशमन दलाला दिली. तर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने दोन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र तोपर्यंत घरातील शेतीसाहित्य, घरातील जीवनावश्यक वस्तू, गहू-तांदूळ, अन्नधान्य व इतर संसारोपयोगी वस्तू भस्मसात झाल्या आहेत. या आगीत शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
घराला लागलेल्या भीषण आगीत शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान - Washim news
जिल्ह्यातील जऊळका येथे रात्री 3 वाजेच्या सुमारास शेतकऱ्याच्या घराला भीषण आग लागल्याची घटना घडली होती. या आगीत शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्याच्या घराला लागलेली आग