वाशिम- गुलाबी थंडीत वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील मलाई वाल्या दुधाची वेगळीच मजा असते. हिवाळ्यात दरवर्षी गावातून बाहेर गावी गेलेली लोकं गावात येऊन या दुधाचा आस्वाद घेतात. मात्र मागच्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे ह्या मलाई दुधाची दुकाने बंद होती. यावर्षी सुरू हे दुकाने सुरू झाली असून जिल्ह्यात दोन दिवसापासून वातावरणात बदल होऊन पारा 16 अंशपर्यंत आला आहे. त्यामुळे या हे मलाई दूध पिण्यासाठी चाहत्यांची गर्दी होत आहे. याठिकाणी दररोज शेकडो लिटर दुधाची विक्री होत असते.
गुलाबी थंडीत गरम मलाई दुधाचा आस्वाद - Malegaon bus stand
मालेगाव शहरात दरवर्षी हिवाळ्यात जुन्या बस स्टॅन्डवरील प्रत्येक हॉटेलसमोर मोठमोठ्या दुधाच्या कढई लावण्यात येते. यामध्ये मलाई असलेले स्पेशल दूध तयार करण्यात येते आणि रात्री 8 नंतर या मलाई दुधाची 20 रुपये ग्लास प्रमाणे विक्री सुरू होते.
मालेगाव शहरात दरवर्षी हिवाळ्यात जुन्या बस स्टॅन्डवरील प्रत्येक हॉटेलसमोर मोठमोठ्या दुधाच्या कढई लावण्यात येते. यामध्ये मलाई असलेले स्पेशल दूध तयार करण्यात येते आणि रात्री 8 नंतर या मलाई दुधाची 20 रुपये ग्लास प्रमाणे विक्री सुरू होते. दुध हा संपूर्ण आहार आहे. लहानांपासून मोठ्यांनी सर्वांनी नियमित दुधाचे सेवन करायला हवे. पण अलिकडे केवळ लहान मुलांनाच दूध दिले जाते. पण असे न करता सर्वच वयातील लोकांनी दूधाचे नियमीत सेवन केल्याने त्यांच्या आरोग्याला वेगवेगळे फायदे होतात. खासकरुन रात्री दूध सेवन केल्याने याचे अधिक फायदे बघायला मिळतात. दुधात कॅल्शिअम, सोडियम, प्रोटीन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन बी १२, अमिनो अॅसिड, फायबर आणि अॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतात. आयुर्वेदानुसार प्रत्येक वयातील व्यक्तींनी दूध सेवन करणे फायदेशीर आहे. तेच रात्री दूध पिण्याचे अनेक फायदे आहेत. जर तुम्ही दूध पित नसाल तर लगेच सुरु करा.