महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाशिम : जिल्हाधिकाऱ्यांनी 'अपहाराची' चौकशी न केल्याने युवक चढला पाण्याच्या टाकीवर - demand

मालेगाव तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथे 'रोहयो'च्या कामात अपहार प्रकरणी चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊनही चौकशी न झाल्याने युवक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मागणी मान्य होत नसल्याने तो पाण्याच्या टाकीवर चढला होता.

मागणी मान्य होत नसल्याने तो पाण्याच्या टाकीवर चढला होता.

By

Published : Jun 3, 2019, 5:16 PM IST

वाशिम - मालेगाव तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथे 'रोहयो'च्या कामात अपहार प्रकरणी चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊनही चौकशी न झाल्याने युवक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. गोपीनाथ नागरे, हा युवक आत्मदहन करण्यासाठी सकाळी ७ वाजता गावातील पाणीच्या टाकीवर चढला होता. याची माहिती मिळताच तहसीलदारांसह पोलीस प्रशासन या युवकाला खाली उतरविण्यासाठी प्रयत्न करत होते. अखेर प्रशासनाच्या प्रयत्नाला यश आले आणि तब्बल ७ तासानंतर हा युवक तहसीलदारांना दिलेल्या अश्वासनाने खाली उतरला.

युवकाची आणि तहसीलदार यांची प्रतिक्रिया

मालेगावचे तहसीलदार रवी काळे यांनी या प्रकरणाची चौकशी १० दिवसात करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे. त्या सोबतच दोषींवर चौकशीनंतर कारवाई करण्यात येणार असल्याचेही यावेळी तहसीलदार रवी काळे यांनी सांगितले.

गोपीनाथ नागरे याने जिल्हाधिकारी यांना गावात रोहोयोच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार दिली होती व चौकशी करून कारवाईची मागणी केली होती. मात्र, जिल्हाअधिकारी यांनी आतापर्यंत कोणतीही चौकशी केली नाही. त्यामुळे गोपीनाथ आज पहाटेच आत्मदहनासाठी गावातील पाण्याच्या टाकीवर चढला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details