महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'पहिली पोळी गरजुंसाठी' उपक्रम; स्थलांतरित मजुरांसाठी व्हॉट्सअ‌ॅप ग्रुपचा पुढाकार - वाशिम संचारबंदी

'पहिली पोळी गरजुंसाठी' या नावाने सुरू असलेल्या उपक्रमाला गावकरी, व्यापारी मोठे सहकार्य करीत आहेत. गावातील महिला आपआपल्या घरी दररोज उपक्रमाला लागणाऱ्या पोळ्या तयार करून देत आहेत.

'पहिली पोळी गरजुंसाठी' उपक्रम; स्थलांतरित मुजरांसाठी व्हॉट्सअॅप ग्रूपचा पुढाकार
'पहिली पोळी गरजुंसाठी' उपक्रम; स्थलांतरित मुजरांसाठी व्हॉट्सअॅप ग्रूपचा पुढाकार

By

Published : May 18, 2020, 9:34 PM IST

वाशिम - कोरोनाच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी सर्वत्र टाळेबंदी करण्यात आली आहे. यामुळे रोजगाराच्या शोधात इतर राज्यात गेलेले मजूर हजारोच्या संख्येने आपल्या गावाकडे परतत आहेत. सामाजिक भावनेतून या कष्टकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था व्हावी, याकरिता जिल्ह्यातील शिरपूर येथील '२४ कॅरेट' व्हॉट्सअ‌ॅप ग्रूपकडून व्यवस्था करण्यात आली आहे. ट्रक, पायदळ रखरखत्या उन्हात प्रवास करत असणाऱ्या रोज हजारो मजुरांना याठिकाणी जेवण, पाणी बॉटल देण्याचे काम या ग्रुपमधील सदस्य करत आहेत.

'पहिली पोळी गरजुंसाठी' उपक्रम; स्थलांतरित मुजरांसाठी व्हॉट्सअॅप ग्रूपचा पुढाकार

शिरपूर येथील '२४ कॅरेट' व्हॉट्सअ‌ॅप ग्रुपच्या माध्यमातून शिरपूरवासीयांकडून मागील आठ दिवसांपासून मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नगर, जालना येथून राज्यात व उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेशमध्ये परत जाणाऱ्या हजारो मजूर, ट्रक, ट्रॅव्हल्स, सायकलीने प्रवास करत आहेत. शिरपूर येथे जेवणाची पाकीटे व पाणी बॉटल वितरण करण्यात येत आहे. मागील शुक्रवारी ३५०, शनिवारी ५५०, रविवारी ७००, सोमवारी ९००, मंगळवारी ३००, बुधवारी १,२००, गुरुवारी १,६००, तर शुक्रवारी १५ मे रोजी ३,००० मजुरांना भोजन पाकीटे व पाणी बॉटलचे वितरण करण्यात आले.

'पहिली पोळी गरजुंसाठी' या नावाने सुरू असलेल्या उपक्रमाला गावकरी, व्यापारी मोठे सहकार्य करीत आहेत. गावातील महिला आपआपल्या घरी दररोज उपक्रमाला लागणाऱ्या पोळ्या तयार करून देत आहेत. यात प्रत्येकाला भोजन पाकिटात प्रत्येकी ३ पोळ्या, शेंगदाणा चटणीचे पाकीट, बिस्कीटचा पुडा, कांदा, लोणचे व पाणी बॉटल देत आहेत. हा उपक्रम रस्त्यावरील मजूर संपत नाही तोपर्यंत सुरू ठेवण्यात येणार असल्याचे ग्रुप सदस्य सांगत आहेत.

वाशिम जिल्ह्यातील मुंबई-नागपूर महामार्गावरील जिल्ह्यातील मालेगाव येथून पायी व ट्रकने हजारो गरजवंत स्थलांतरित लोकांसाठी शिरपूर जैन वासियांतर्फे ही सेवा मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. सर्वत्र बंद असल्यामुळे ह्या लोकांची अन्नाची व पाण्याची फार मोठी गैरसोय होत आहे. गावात प्रत्येक घरातील पोळी ही गरजवंत लोकांसाठी बनवत संपूर्ण गाव या उपक्रमात सहभागी होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details