वाशिम - कारंजा शहरात बँक वसुली करणाऱ्या राजेश ढोके यांची एक लाख 30 हजार रुपये असलेली बॅग रविवारी सायंकाळी एका ठिकाणी विसरली. ही बॅग अमोल डोईफोडे यांच्या सुपर मटण शॉपमध्ये आढळली. यानंतर अमोल यांनी बॅग उघडून पाहिल्यांनतर त्यांना यात पैसै असल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी बॅग शहर पोलिसांत जमा केली.
मटण शॉप चालकाचा प्रामाणिकपणा, 1 लाख 30 हजारांची रोकड केली परत
कारंजा शहरात बँक वसुली करणाऱ्या राजेश ढोके यांची एक लाख 30 हजार रुपये असलेली बॅग रविवारी सायंकाळी एका ठिकाणी विसरली. ही बॅग अमोल डोईफोडे यांच्या सुपर मटण शॉपमध्ये आढळली. यानंतर अमोल यांनी बॅग उघडून पाहिल्यांनतर त्यांना यात पैसै असल्याचे लक्षात आले.
मटण शॉप चालकाचा प्रामाणिकपणा
पोलिसांनी खातरजमा करत ओळख पटल्यानंतर मूळ मालक असलेल्या राजेश ढोके यांना ही बॅग परत दिली. यानंतर आनंद ढोके यांनी अमोल डोईफोडे यांचे आभार मानले. डोईफोडे यांच्या या प्रामाणिकपणामुळे कारंजा शहरात माणुसकीचे दर्शन घडले.