महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'फिजिकल डिस्टन्सिंग'चे पालन करत बोरगाव ग्रामपंचायतीमध्ये पार पडला विवाह - वाशिम जिल्हा बातमी

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशात 3 लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे 'फिजिकल डिस्टन्सिंग'चे पालन करत हा सोहळा संपन्न झाला. वधू-वराने लग्नाला होणारा खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत केली. मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यासाठी गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांच्याकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला.

lockdown
बोरगाव ग्रामपंचायतीमध्ये पार पडला विवाह

By

Published : May 12, 2020, 4:38 PM IST

Updated : May 12, 2020, 5:33 PM IST

वाशिम- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालेगाव तालुक्यातील बोरगाव येथे ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून एक आदर्श विवाह संपन्न झाला आहे. ग्रामपंचायतीमध्ये गर्दी न जमवता मोजक्या लोकांच्या उपस्थित हा विवाह पार पडला. 'फिजिकल डिस्टन्सिंग'चे पालन करत हा सोहळा संपन्न झाला. या विवाहाला सरपंच, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी उपस्थित होते.

बोरगाव ग्रामपंचायतीमध्ये पार पडला विवाह

बोरगाव येथील हनुमान बबन डहाळके आणि आमखेडा येथील नंदिनी धनराज गोरे यांचे लग्न 12 मे ला करण्याचे ठरले होते. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशात 3 लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे लोकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे बोरगाव ग्रामपंचायतीने हा विवाह साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज वधू-वराचे आईवडील आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विवाह पार पडला.

यावेळी 'सोशल डिस्टन्सिंग'च्या सर्व नियमांचे पालन करुन हात धुण्यासाठी सॅनिटायजरचा वापर करण्यात आला. वधू-वराने लग्नाला होणारा खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत केली. मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यासाठी गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांच्याकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला.

Last Updated : May 12, 2020, 5:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details