वाशिम - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या भीतीने वाशिम जिल्ह्यात यंदा झेंडूची लागवड निम्म्याहून अधिक घटली. त्यातच काही शेतकऱ्यांनी झेंडू हैदराबाद मार्केटमध्ये विक्रीसाठी नेल्यामुळे वाशिम बाजारात आवक कमी झाली आहे. त्यामुळं आज(रविवार) दसऱ्याला झेंडूच्या फुलांना प्रति किलो 100 रुपये भाव मिळाला आहे.
कोरोनामुळे वाशिम जिल्ह्यात झेंडूची लागवड घटली आहे. त्यामुळे यावर्षी या शेतकऱ्यांनी झेंडूची लागवड केली त्या शेतकऱ्यांना चांगला फायदा झाला आहे. तर यासोबत काळ्या उसाला प्रति नग 30 रुपये भाव मिळाल्याने झेंडू आणि काळा ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. झेंडू व कळ्या ऊसाला खरेदीसाठी शहरातील नागरिकांना चांगली गर्दी केली होती. उसाला व झेंडूला चांगले भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला.