महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाशिममध्ये अवकाळी पावसामुळे आंबा बागेचे प्रचंड नुकसान, सरकारकडून मदतीची मागणी - शेतकरी

बदलते हवामान आणि निसर्गाचा लहरीपणा यामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकरी पुरता हैराण झाला आहे. कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटाने त्रस्त असलेल्या शेतकऱ्याला पुन्हा उभारी मिळण्यासाठी सरकारी मदतीची गरज आहे.

अवकाळी पावसामुळे आंबा बागेचे नुकसान

By

Published : Apr 5, 2019, 1:15 PM IST

वाशिम- जिल्ह्यात गुरुवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने आंबा बागेचे प्रचंड नुकसान झाले. यामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत अधीकच भर पडली आहे. मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्याला शासनाने सर्वे करून त्वरित मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

अवकाळी पावसामुळे आंबा बागेचे नुकसान

कोकण पाठोपाठ वाशिम जिल्ह्यातही आंबा बागेचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाशीम येथील सुनील लोनसुने यांनी मोठ्या कष्टाने ५ एकरावर आंब्याची बाग लावली. तर मागील ५ वर्षापासून ते आंबा बागेचे व्यवस्थापन करत आहेत. यामधून त्यांना किमान १५ लाख रुपये उत्पन्नाची आशा होती. मात्र, बदलते हवामान आणि गुरूवारी झालेल्या अवकाळी पावसाने विक्रीला आलेला आंबा गळून गेला. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे आंब्याची बाग ७० टक्के नष्ट झाले. त्यामुळे फळबाग उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. या नुकसानीचा सर्वे करून शासनाने मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे.

बदलते हवामान आणि निसर्गाचा लहरीपणा यामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकरी पुरता हैराण झाला आहे. कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटाने त्रस्त असलेल्या शेतकऱ्याला पुन्हा उभारी मिळण्यासाठी सरकारी मदतीची गरज आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details