वाशिम - जिल्ह्यात 'महिलाराज' आल्याचे पहायला मिळत आहे. जिल्ह्यातील सहापैकी सहाही पंचायत समित्यांच्या सभापती पदावर महिला नेतृत्वाची निवड झाली आहे. त्यामुळे सहाही पंचायत समित्यांच्या कारभारणी या आता महिला असणार आहे.
वाशिम जिल्ह्यामध्ये सहाही पंचायतींच्या सभापती पदावर महिलांची निवड हेही वाचा... अजित पवारांना स्टेपनी म्हटलं तरी त्यांचे समर्थक गप्प कसे ?
वाशिम जिल्ह्यातील सहा पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. यामध्ये वाशिममध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या रेश्मा गायकवाड या सभापती तर उपसभापती पदी शिवसेनेच्या सविता जाधव यांची निवड झाली. त्याचप्रमाणे रिसोडमध्ये जनविकास आघाडीच्या गीता हरीमकर यांची सभापती तर उपसभापती पदी सुभाष खरात यांची निवड झाली.
हेही वाचा... मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला तब्बल 2 कोटी 89 लाखांचा खर्च, आरटीआयमधून उघड
मंगरुळपिरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीपाली इंगोले यांची सभापती पदावर तर उपसभापती शिवसेनेचे हरीश महाकाळ यांची निवड करण्यात आली. कारंजामध्ये राष्ट्रवादीच्या सविता रोकडे या सभापती तर वंचित बहुजन आघाडीचे किशोर ढाकुळकर यांची उपसभापती पदी निवड करण्यात आली. मानोरामध्ये भाजपच्या रुपाली राऊत या सभापती तर सागर जाधव हे उपसभापती बनले. मालेगावमध्ये जनविकास आघाडीच्या शोभाबाई गोंडाळ यांची सभापती पदावर निवड करण्यात आली. तर, उपसभापती पदावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुमित्रा घोडे यांची निवड झाली आहे.
हेही वाचा... #GSAT 30: इस्रोचे 2020 वर्षातील पहिले प्रक्षेपण यशस्वी; कम्युनिकेशन, इंटरनेट सेवेला होणार फायदा
एकंदरीतच जिल्ह्यातील सहापैकी सहाही ठिकाणी महिलांनाच सभापती पदाची संधी मिळाली असल्याने पंचायत समितीमध्ये 'महिलाराज' आल्याचे पहायला मिळत आहे.