वाशिम- कृषीपंप जोडणी मिळावी यासाठी 2012 मध्ये महावितारणकडे रितसर कोटेशन भरूनसुद्धा अद्यापपर्यंत वीज जोडणी मिळाली नाही. मात्र, वीज जोडणी नसतानाही शेतकऱ्याला तब्बल 8 हजार 460 रुपये बिल आल्याचा धक्कादायक प्रकार वाशिम जिल्ह्यात समोर आला आहे. महावितरणच्या या प्रकरणामुळे दुष्काळात होरपळणाऱया शेतकऱयांना शॅाकच बसला आहे.
दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना महावितरणचा 'शॉक'; वीज न वापरूनही पाठवले बिल
मालेगाव तालुक्यातील पांगरीनवघरे येथील कैलास शिंदे यांच्या शेतात वीज जोडणी नसतानाही या शेतकऱ्याला बिल देऊन वीजवितरण कंपनीने अजब कारभार केला आहे.
दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना महावितरणचा 'शॉक'
मालेगाव तालुक्यातील पांगरीनवघरे येथील कैलास शिंदे यांच्या शेतात वीज जोडणी नसतानाही या शेतकऱ्याला बिल देऊन वीजवितरण कंपनीने अजब कारभार केला आहे. त्यामुळं आधीच दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना महावितारणने शॉकच दिला आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीकडे लेखी तक्रार केली असून याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Last Updated : May 11, 2019, 5:25 PM IST