महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाशिम जिल्हा परिषद महाविकास आघाडीला राखण्यात यश, 52 पैकी 31 जागा - washim zp results

जिल्हा परिषदेचे निकाल आज जाहीर झाले. वाशिम जिल्हा परिषद अध्यक्ष पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर काँग्रेसकडे उपाध्यक्ष पद होते, तर शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांना एक सभापती पद देऊन सत्ता स्थापन करण्यात आली. मात्र ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर 14 जागा रिक्त झाल्याने त्यासाठी मंगळवारी मतदान पार पडले, तर आज मतमोजणी पार पडली आहे.

वाशिम जिल्हा परिषद महाविकास आघाडीला राखण्यात यश
वाशिम जिल्हा परिषद महाविकास आघाडीला राखण्यात यश

By

Published : Oct 6, 2021, 5:02 PM IST

वाशिम-स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. वाशिम जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीला सत्ता राखण्यात यश आले आहे. जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीत 52 पैकी 31 जागावर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळला आहे.

वाशिम जिल्हा परिषद महाविकास आघाडीला राखण्यात यश
ओबीसी आरक्षण रद्द होण्याआधी वाशिम जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता होती. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद अध्यक्ष तर काँग्रेसकडे उपाध्यक्ष पद होते, तर शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांना एक सभापती पद देऊन सत्ता स्थापन करण्यात आली. मात्र ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर 14 जागा रिक्त झाल्याने त्यासाठी मंगळवारी मतदान पार पडले, तर आज मतमोजणी पार पडली आहे.
वाशिम जिल्हा परिषद महाविकास आघाडीला राखण्यात यश

बुधवारी झालेल्या मतमोजणीत जिल्हा परिषदेच्या एकूण जागेत गत निवडणुकीपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन जागा वाढल्या असून, 14 जागा राष्ट्रवादीकडे आहेत. राष्ट्रवादीनंतर कॉंग्रेस 11 जागा शिवसेनेकडे 6 जागा असल्याने जिल्हा परिषद मधील एकूण 52 पैकी महाविकास आघाडीकडे 31 जागा असल्याने महाविकास आघाडी सत्तेत कायम राहणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details