महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लक्झरी बस भीषण अपघातात 1 ठार 8 जखमी - मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्गावर लक्झरी बसचा अपघात

मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्गावर मालेगाव तालुक्यात खाजगी लक्झरी बसचा अपघात झाला आहे. या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून आठ जण जखमी झाले आहेत.

luxery bus accident 1 death 8 injured in washim
मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्गावर लक्झरी बसचा अपघात

By

Published : Jun 12, 2021, 1:07 AM IST

वाशिम -मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्गावर मालेगाव तालुक्यातील चांडस गावाजवळ शिवबा महाराष्ट्र ही खाजगी लक्झरी बस रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. दरम्यान घटनास्थळी शिरपूर पोलीस पोहचले असून, जखमींना पुढील उपचारासाठी दवाखान्यात पाठविण्यात आले आहे.

मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्गावर लक्झरी बसचा अपघात

साईट पट्ट्या भरल्या नसल्यामुळे अपघात -

सदर लक्झरी बस पुण्यावरून पुसदकडे जात होती. लक्झरी बसमध्ये सर्व प्रवासी हे वीटभट्टी मजूर कामगार होते. नागपूर - मुंबई या राज्य महामार्गावर रस्त्याच्याकडेला साईट पट्टया भरल्या नसल्यामुळे सदरचा अपघात झाला असल्याचे पोलीस सूत्रांकडून कळाले.

हेही वाचा - अहमदनगर : अजोबाच्या मदतीने वडिलांचा खून, दोघेही अटकेत

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details