वाशिम - जिल्ह्यात पशुधनावर 'लंपी स्किन डिसीज' विषाणूजन्य साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. या आजारावर लस किंवा ठोस औषधोपचार उपलब्ध नाही. वासरांमध्ये याची तीव्रता जास्त प्रमाणात दिसून येत आहे. या आजारामुळे दुधाळ जनावरांना जास्त फटका बसत असल्याने पशुपालकांची चिंता वाढली आहे.
'लंपी स्किन डिसीज' विषाणूजन्य साथीच्या आजाराचे अनेक भागांतील जनावरांमध्ये लक्षणे दिसून येत आहेत. तरी या गंभीर बाबीकडे प्रशासन लक्ष द्यायला तयार दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहे. या गंभीर आजारामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन लवकरात लवकर या आजारावर नियंत्रण मिळवणारी औषध उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.