वाशिम- जिल्ह्यात शुक्रवारी दिल्ली येथील निजामुद्दीन येथील कार्यक्रमात सहभागी झालेला व्यक्ती आढळल्याने भीतीचे वातावरण आहे. अशातच लोक संचारबंदीचे उल्लंघन करून नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे वाशिम पोलीस अॅक्शन मोडवर आहेत. पोलिसांनी विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना लाठ्यांचा प्रसाद देत उड्या मारण्याची शिक्षा दिली.
लॉकडाऊन : वाशिमध्ये पोलीस ‘अॅक्शन मोडवर’, विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना काठ्यांचा 'प्रसाद' - कोरोना विषाणू
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाने गर्दी व संसर्ग टाळण्यासाठी संचारबंदी लागू केली असली तरी नागरिक घराबाहेर पडायचे थांबतच नाहीत.
विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना काठ्याचा 'प्रसाद'
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाने गर्दी व संसर्ग टाळण्यासाठी संचारबंदी लागू केली असली तरी नागरिक घराबाहेर पडायचे थांबतच नाहीत. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडू नये, असे पोलिसांनीही आवाहन केले आहे. तर नागरिकांनी ऐकले नाही, तर आम्ही कठोर भूमिका घेऊ, असे पोलिसांनी सांगितले आहे.