महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाशिम : सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंतच दुकाने सुरू, दुकानदारांकडून नियमांचे पालन - वाशिम बातमी

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आजपासून वाशिम जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाकडून संचारबंदीच्या नियमावलीत बदल करण्यात आले आहे. सकाळी 7 ते दुपारी 11 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना मुभा देण्यात आली आहे. यामुळे 11 च्या नंतर वाशिमच्या व्यापाऱ्यांनी अत्यावश्यक सेवांची आस्थापने स्वतःच बंद केली आहेत.

lockdown in washim
lockdown in washim

By

Published : Apr 21, 2021, 3:07 PM IST

Updated : Apr 21, 2021, 3:21 PM IST

वाशिम - कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आजपासून वाशिम जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाकडून संचारबंदीच्या नियमावलीत बदल करण्यात आले आहे. सकाळी 7 ते दुपारी 11 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना मुभा देण्यात आली आहे. यामुळे 11 च्या नंतर वाशिमच्या व्यापाऱ्यांनी अत्यावश्यक सेवांची आस्थापने स्वतःच बंद केली आहेत. तर वाशिम शहरातील रस्त्यावर दुपारी 11 च्या नंतर शुकशुकाट दिसून येत आहे. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईसाठी पाटणी चौकात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून आता या विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची वाहने जप्त करत असून त्यांना समज देण्यात येत आहे. स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी हे रस्त्यावर उतरून कारवाई करत आहेत.

वाशिममध्ये सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंतच दुकाने सुरू
वाशिम शहरातील व गावातील पेट्रोल पंप हे 9 ते 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश असल्यामुळे अत्यावश्यक लोकांनाच पेट्रोल देण्यात येणार आहे. मात्र 11 च्या नंतर विनाकारण पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या लोकांना पेट्रोल देण्यास मनाई केली आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. मात्र यामुळे काही प्रमाणात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर अंकुश लागणार आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी कडक कारवाई सुरु केली आहे. गतवर्षीप्रमाणे आताही अशा लोकांची वाहने जप्त करण्यात येणार असून संचारबंदी असेपर्यंत ही वाहने पोलीस ठाण्यात ठेवण्यात येतील. तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुद्धा करण्यात येणार आहे.स्थानिक खासगी वाहतूक सकाळी 9 ते 11 पर्यंत चालू राहिणार सुरू तर सार्वजनिक वाहतूक नियमितपणे सुरु राहील. त्यानंतर रस्त्यावर ही वाहन दिसत असून असल्या वाहनधारकांना पोलीस तपासणी करून कारवाई करत आहे.
Last Updated : Apr 21, 2021, 3:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details