वाशिम- आजपासून १७ मे पर्यंतच्या लॉकडाऊन-३ ची सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने कन्टेनमेंट परिसर सोडून सर्वच झोनमध्ये हेअर सलून, दारूची दुकाने, व उपहारगृहांसह इतर काही दुकानांना सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ग्रीन झोन असलेल्या वाशिम जिल्ह्यातील ही सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक यांनी दिले आहे.
ग्रीन झोन असूनही वाशिम जिल्ह्यात दारूची दुकाने बंद; बाजारपेठेत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा - वाशिम
काही अटी शर्थींवर कापड दुकान, बूट हाऊस, जनरल स्टोअर्स अशा सर्व दुकानांना उघडण्याची परवानगी जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक यांनी दिली आहे. मात्र, नागरिकांनी बाजारपेठेत तोबा गर्दी केल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडल्याचे दिसून आले आहे.
ग्रीन झोन असूनही वाशिम जिल्ह्यात दारूची दुकाने बंद
जिल्ह्यात काही अटी शर्थींवर फक्त कापड दुकान, बूट हाऊस, जनरल स्टोअर्स या दुकानांनाच उघडण्याची परवानगी जिल्हाधिकारी मोडक यांनी दिली आहे. दरम्यान, नागरिकांनी बाजारपेठेत तोबा गर्दी केल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील नागरिकांना कोरोनाचे काहीच गांभीर्य नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
हेही वाचा-उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या ट्रक चालकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात खळबळ