वाशिम -जिल्ह्यातील तऱ्हाळा येथील दिलीप भगत या शेतकऱ्याने एक एकरावर लागवड केली. मात्र ऐन विक्रीच्या मोसमात कोरोनाचा प्रसार वाढल्याने संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे बाजार समित्यांमधील व्यवहार ठप्प झाले; आणि माल शेतातच पडून राहिला. यानंतर त्यांनी स्वत: शेतमाल विकण्याचा प्रयत्न केला. मात्र लॉकडाऊनच्या काळात ग्राहक न मिळाल्याने त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. या लागवडीसाठी 70 हजार रुपये खर्च आला असून आता उत्पादन खर्च देखील वसूल होत नसल्याने ते हतबल झाले आहेत.
कलिंगड उत्पादक शेतकरी अडचणीत... माल अद्याप शेतातच! - watermelon farming in washim
जिल्ह्यातील तऱ्हाळा येथील दिलीप भगत या शेतकऱ्याने एक एकरावर लागवड केली. मात्र ऐन विक्रीच्या मोसमात कोरोनाचा प्रसार वाढल्याने संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे बाजार समित्यांमधील व्यवहार ठप्प झाले; आणि माल शेतातच पडून राहिला.
लॉक़डाऊनचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. उद्योगधंदे बंद असल्याने उत्पादन ठप्प तर झालेच आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या उत्पादनांना देखील ग्राहक मिळत नाहीत, अशी स्थिती आहे. यंदा संचारबंदीमुळे जिल्ह्यातील अन्य कलिंगड उत्पादकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. काहींच्या पारंपरिक कलिगडांच्या बागा आहेत. उत्पादन काढणीला आल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला. सरकारने लॉकडाऊन घोषित केले. यामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले. शेतमाल विकण्यासाठी बाजार समित्या उपलब्ध नसल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली. त्यामुळे अनेकांनी स्वत: माल विकण्याचा निर्णय घेतला. परंतू, संचारबंदी दरम्यान लोक बाहेर पडत नव्हते. यामुळे शेतमाल विक्री करण्यासाठी अडचणी वाढल्या.