महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाशिममध्ये जादा दराने दारूविक्री, राज्य उत्पादन शुल्क विभागाने दुकान केले सील - एस.एस.जयस्वाल वाईन शॉप

टाळेबंदीच्या काळात दारु विक्रीला सशर्त परवानगी शासनाने दिली आहे. त्यामुळे मद्यविक्रीच्या दुकानांसमोर मद्यप्रेमींची गर्दी वाढली होती. याचा गैरफायदा घेत शहरात जादा दराने दारुविक्री करत मद्यपींची लुट केली जात होती. यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत हे दुकान सील केले आहे.

liquor shop
कारवाई झालेले दुकान

By

Published : May 9, 2020, 6:17 PM IST

वाशिम - शहरातील एस. एस. जयस्वाल वाईन शॉपवर वाढणाऱ्या गर्दीचा फायदा घेत जादा दराने दारूविक्री होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. यावरून या शॉपवर कारवाई करत राज्य उत्पादन शुल्क विभागाने दुकान सील केले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात अत्यावश्यक सेवावगळता सर्वत्र टाळेबंदी करण्यात आली होती. मात्र 6 मेपासून शासनाने सशर्त दारुची दुकान उघडण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर तब्बल पंनास दिवसाने दारूची दुकाने उघडल्याने मद्यप्रेमींनी दुनावर मोठी गर्दी केली होती. या गर्दीचा फायदा घेत शहरातील एस. एस. जयस्वाल वाईन शॉपमध्ये जादा दराने मद्यविक्री सुरू केली. याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार आज संबंधित विभागाने वाशिम शहरातील एस. एस. जयस्वाल वाईन शॉप कारवाई करीत दुकान सील केले असून, पुढील तपास सुरु आहे.

हेही वाचा -वाशिममध्ये नागरिकांची रस्त्यांवर गर्दी, 'फिजिकल डिस्टन्सिंग'चा फज्जा

ABOUT THE AUTHOR

...view details