महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एलआयसी कार्यालयात गेलेला व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने कार्यालय बंद करण्याचा निर्णय - वाशिम कोरोना अपडेट्स

वाशिम जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांत वाढ होत आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वाशिम शहरातील एलआयसी ऑफिसच्या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात असलेला बाहेरील व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आला आहे. यामुळे खबरदारी म्हणून वाशिम येथील एलआयसी शाखेने संपूर्ण शाखा सॅनिटाईझ करून दोन दिवसासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

कार्यालय बंद करण्याचा निर्णय
कार्यालय बंद करण्याचा निर्णय

By

Published : Aug 6, 2020, 10:50 PM IST

वाशिम : येथे एलआयसी कार्यालयात पैसे भरण्याकरिता गेलेला व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. यामुळे त्याच्या संपर्कातील एलआयसी कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर, खबरदारीचा उपाय म्हणून एलआयसी कार्यालय बंद करण्यात आले आहे.

वाशिम जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांत वाढ होत आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वाशिम शहरातील एलआयसी ऑफिसच्या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात असलेला बाहेरील व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तो शाखेत पैसे भरण्याकरता गेला होता. यामुळे खबरदारी म्हणून वाशिम येथील एलआयसी शाखेने संपूर्ण शाखा सॅनिटाईझ करून दोन दिवसासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर दुसरीकडे, एलआयसी ऑफिस अचानक बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने ग्राहकांची नाहक गैरसोय झाली आहे. परिणामी ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details