महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोयाबीनच्या गंजीत आढळला किंग कोब्रा... अन् - वाशिम नाग सापडला

रिधोरा येथील शेतकरी दाहांत्रे यांच्या शेतातील सोयाबीनच्या सुडीमध्ये सात फुट लांबीचा कोब्रा जातीचा नाग आढळून आला. सोयाबीन वेगळी करण्याची कृती सुरू असताना हा नाग सापडला.

शेताता सापडला सात फुट लांबीचा किंग कोब्रा

By

Published : Nov 14, 2019, 9:12 AM IST

वाशिम - रिधोरा येथील शेतकरी दाहांत्रे यांच्या शेतातील सोयाबीनच्या सुडीमध्ये सात फुट लांबीचा कोब्रा जातीचा नाग आढळून आला. सोयाबीन वेगळी करण्याची कृती सुरू असताना हा नाग सापडला. शेतकरी व मजुरांनी ही माहिती तत्काळ सर्प मित्राला कळवली असता, त्याने हा नाग पकडून जंगलात सोडून दिला.

शेताता सापडला सात फुट लांबीचा किंग कोब्रा

हेही वाचा - ऑनलाईन दारू मागवणे पडले महागात; ५० हजाराची केली फसवणूक

शेताता मजूर काम करत असताना त्यांना हा नाग दिसला. यावेळी मजूर व शेतकरी घाबरुन गेले होते. त्यांनी याची माहिती सर्प मित्र राजू साठे यांना कळवली. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या सर्प मित्र साठे यांनी मोठ्या शिताफीने सापाला पकडले. त्यावेळी शेतमालकासह मजुरांनी सुटकचा निश्वास सोडला. त्यानंतर सर्प मित्र साठे यांनी त्या नागाला जंगलातील सुरक्षीत अधिवासात सोडून दिले.

हेही वाचा - बदलापूरमध्ये सापडले २ लाख ५८ हजारांचे चरस; अज्ञाताविरुद्ध गु्न्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details