वाशिम- बहीण-भावाच्या नात्यावर प्रकाश टाकणाऱ्या आपण आजवर अनेक कथा-कादंबऱ्या, नाटिका, चित्रपटाच्या माध्यमातून वाचल्या-ऐकल्या अन् पाहिल्या असतील. अशीच बहीण-भावाच्या नात्यातील पैलू उलगडणारी एक प्रेरणादायी गोष्ट घडली आहे. डॉक्टर असलेल्या भावाला किडनी (मूत्रपिंड) देऊन बहिणीने जीवनदान दिले आहे. भाऊ डॉ. दामोधर काळे आणि बहीण देवकाबाई वानखेडे यांच्या अनोख्या नात्याची ही कहाणी आहे.
समाजात गैरसमज असतानाही बहिणीने घेतला धाडसी निर्णय
डॉ. दामोधर काळे हे भटउमरा (जि. वाशिम) या गावचे आहेत. पाच भाऊ आणि तीन बहीण, असा त्यांचा परिवार असून त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहेत. 2017 मध्ये डॉ. काळे हे एका कार्यक्रमातून घरी परल्यानंतर बेशुद्ध झाले. वैद्यकीय तपासणीत त्यांची किडनी निकामी झाल्याची कळाली. किडनी प्रत्यारोपणासाठी त्यांच्या मुलाने गुजरात येथील नाडीयाद येथे नेले. असावेळी त्यांची बहीण देवकाबाई या आपल्या भावाच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहिल्या. अवयवदान किंवा किडनीदानविषयी समाजामध्ये अजूनही कितीतरी गैरसमज असताना किडनी दानाचे धाडसी निर्णय देवकाबाई यांनी घेतला.
भावासाठी बहिणीने संसाराचाही विचार केला नाही