महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'सास'च्या मदतीने कारंजा पोलिसांनी स्वीकारले पीडित तरुणीचे पालकत्व - young victim

पोलिसांनी प्राथमिक तपास तसेच, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात वैद्यकीय तपासणीनंतर किशोरवयीन मुलीला एका पथकाद्वारे अमरावती येथील मुलींच्या वसतीगृहात पाठवण्यात आले.

'सास'च्या मदतीने कारंजा पोलिसांनी स्वीकारले पीडित तरुणीचे पालकत्व

By

Published : Mar 16, 2019, 5:33 PM IST

वाशिम -कुठलाही अनुचित प्रकार घडो, घटना घडो, भांडण-तंटे, वा अपघात असो यामध्ये, पोलीस प्रशासनाद्वारे प्रकर्षांने पाहिले जाते हद्द कुठली आहे. या पोलीस खाक्याच्या हद्दीच्या फेऱ्यांमुळे बऱ्याच वेळा सर्वसामान्य नागरिकांना आपल्या हक्कापासून, न्यायापासून वंचित राहावे लागते. मात्र, कारंजा शहर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी हा हद्दीचा तिढा बाजूला ठेवला आहे. याला ते अपवाद ठरले असून त्यांनी एका निराधार मुलीला सुरक्षित स्थळी पोहोचवून तिच्या पालकत्वाची जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलून समाजामध्ये एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

कारंजा तालुक्यातील ग्राम दोनद बस थांब्यावर १६-१७ वर्षाची आपदग्रस्त अनोळखी मुलगी फिरत असल्याचे 'सास' सदस्यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलीस पाटलांच्या मदतीने चाईल्ड लाईन 1098 चा क्रमांक डायल करून माहिती प्राथमिक स्तरावर धनज पोलीस ठाण्यात कळवली. या वेळी दोनद नाकाबंदी स्थळी कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी विजय राठोड यांनी विषयाचे गांभीर्य लक्षात घेत त्या मुलीला निरीक्षणगृहापर्यंत पोहचते करण्यास 'सास' प्रमुखांना मदतीची हाक दिली. त्यांनी सुद्धा याला प्रतिसाद देत सदस्यांना रुग्णवाहिकेसह घटनास्थळी रवाना करून तीला कारंजा शहर पोलीस ठाणे येथे आणले. पोलिसांनी प्राथमिक तपास तसेच, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात वैद्यकीय तपासणीनंतर किशोरवयीन मुलीला एका पथकाद्वारे अमरावती येथील मुलींच्या वसतीगृहात पाठवण्यात आले.

पोलीस म्हटले, की निष्ठूर दंडुकेशाही, दयामाया, भूतदया यापासून वंचित असलेला विभाग या दृष्टीनेच समाज या विभागाकडे पाहत असतो. मात्र, कारंजा शहर पोलीस स्टेशनने आम्हाला सुद्धा माणुसकी, सामाजिक जाणीव असते, याबाबीचा प्रत्यय शहरातील 'सास' या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने दोनद येथील एका घटनेतून दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details