महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हाराळ येथील शेतकऱ्याने दीड एकर डाळिंब बागेवर फिरवला जेसीबी - washim latest news

रिसोड तालुक्यातील हाराळ येथील भीमराव बिल्लारी यांनी दीड एकरातील डाळिंबावर जेसीबी फिरवून बाग नष्ट केली आहे.

jcb
शेतकऱ्याने दीड एकर डाळिंब बागेवर फिरवला जेसीबी

By

Published : Feb 27, 2021, 7:05 PM IST

वाशिम - निसर्गाचा लहरीपणा आणि कोरोनाचे संकट या दुहेरी संकटात सापडलेल्या रिसोड तालुक्यातील हाराळ येथील भीमराव बिल्लारी यांनी दीड एकरातील डाळिंबावर जेसीबी फिरवून बाग नष्ट केली आहे.

शेतकऱ्याने दीड एकर डाळिंब बागेवर फिरवला जेसीबी

अल्पभूधारक शेतकरी बिल्लारी यांनी फळ बागेतून चांगलं उत्पन्न मिळेल या आशेने दीड एकरात डाळिंबाची लागवड केली. त्या बागेची लहान मुलाप्रमाने देखरेखही केली. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून हवामानात होणारे बदल, तसेच बाजारात दर मिळत नसल्याने हतबल होऊन बाग नष्ट करण्याची वेळ या शेकऱ्यावर आली आहे.

वाशिम जिल्ह्यात सद्या कोरोना रुग्णात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे या डाळिंबांसाठी व्यापारी येत नसल्याने आता करावं तरी काय? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. त्यामुळे या शेतकऱ्याने आपल्या उभ्या पिकावर जेसीबी फिरवला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details