महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 20, 2023, 8:42 AM IST

ETV Bharat / state

Jain Community Sects Clash: ४२ वर्षानंतर खुले झाले जैन मंदिर, प्लास्टरिंगवरून दिगंबर आणि श्वेतांबर पंथांच्या भाविकांमध्ये हाणामारी

वाशिममध्ये मंदिराच्या वादावरून जैन समाजात हाणामारी झाली. दिगंबर आणि श्वेतांबर पंथांमध्ये वाद सुरू आहे. रविवारी ही घटना घडली. हे मंदिर सुमारे 42 वर्षानंतर खुले झाले होते.

Jain community sects clash
जैन समाजात हाणामारी

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील शिरपूर भागात रविवारी जैन समाजातील विविध पंथातील दोन गटांमध्ये दीर्घकाळ चाललेल्या वादातून हाणामारी झाली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरपूर येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ महाराज मंदिराच्या प्लास्टरिंगवरून समाजातील दिगंबर आणि श्वेतांबर पंथांमध्ये वाद सुरू आहेत. याबाबत मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात अनेक दिवाणी दावे आणि याचिका दाखल झाल्या होत्या.

प्लास्टरिंगचे स्वरूप वादाचा विषय :सर्वोच्च न्यायालयाने 22 फेब्रुवारी रोजी अंतरिम निकाल देऊन श्वेतांबर पंथाला मंदिरातील मूर्तीचे प्लास्टरिंग करण्याचा अधिकार दिला होता, असे ते म्हणाले. प्लास्टरिंगचे स्वरूप दोन पंथांमधील वादाचा विषय होता. 1981 पासून मंदिर या मुद्द्यावरून बंद होते. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर, 11 मार्चनंतर मूर्तीचे प्लास्टरिंग करण्यासाठी मंदिर पुन्हा उघडण्यात आले. मात्र, शनिवारी सुरत येथील श्वेतांबर पंथातील एका भाविकावर दुसऱ्या गटातील एका स्थानिक व्यक्तीने हल्ला केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दोन्ही पंथातील लोकांच्या बैठका :हल्ल्याचा निषेध करण्यासाठी श्वेतांबर पंथाच्या लोकांनी मोर्चा काढला. तो दिगंबर पंथाच्या परिसरातून गेला, ज्यामुळे हाणामारी झाली. ते म्हणाले की पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. माध्यमांशी बोलताना वाशिमचे पोलिस अधीक्षक बच्चन सिंग म्हणाले की, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी शांतता राखण्यासाठी दोन्ही पंथातील लोकांच्या बैठका घेतल्या. या घटनेसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जैन धर्मातील पंथ :जैन धर्माला मानणारे दिगंबर आणि श्वेतांबर हे प्रमुख दोन पंथ आहेत. श्वेतांबर पंथाचा इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात उदय झाला. दिगंबर पंथाचे सर्व तीर्थंकर दीक्षा धारण केले आहेत. त्यांचे मुनी दिगंबरवृत्तीने धर्मोपदेश देतात. साध्वी या पूर्ण श्वेत सुती साडी परिधान करतात. श्वेतांबर पंथाचे सर्व मुनी शुभ्र वस्त्रे परिधान करतात. श्वेतांबर पंथात मूर्तिपूजक, स्थानकवासी, आणि तेरापंथी स्थानकवासी हे तीन उपपंथ स्थाृ जैन पंथीयांचा हिंसेला विरोध आहे. ते अहिंसाप्रिय आहेत. ते संपूर्ण शाकाहारी असतात.

हेही वाचा : Man Drowning In Ganga: डोळ्यासमोर बुडत होता तरूण...गोताखोर करत राहिले पैशाची मागणी; अखेर 'त्याने' गमावला जीव

ABOUT THE AUTHOR

...view details