वाशिम- लॉकडाऊनमुळे हातचे काम गेल्याने महानगरातून परत गावी येणाऱ्या मजुरांना शाळेत 14 दिवस क्वारंटाईन केले जात आहे. मात्र, वाशिम जिल्ह्यातील शेंदुर्जना मोरे येथे मुंबई येथून गावात आलेल्या डोंगरे कुटुंबाने शेतात क्वारंटाईन होण्याचे ठरविले आहे.
शेतात क्वारंटाईन राहून करणार मशागत - washim corona latest news
वाशिम जिल्ह्यातील शेंदुर्जना मोरे येथे मुंबई येथून गावात आलेल्या डोंगरे कुटुंबाने शेतात क्वारंटाईन होण्याचे ठरविले आहे.

वेळेचा सदुपयोग ; 14 दिवस शेतात क्वारंटाईन राहून करणार मशागत
शेतातच झोपडी तयार करून 14 दिवस शेतातील मशागत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे शेतातील मशागत होणार असून यांच्याप्रमाणे विलगीकरणात असलेल्या कुटुंबांनी शेतात राहून मशागत केल्यास आपला वेळ सदुपयोगी लागेल यात मात्र शंका नाही.