महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मालेगाव शहरात एकाच दिवशी 80 व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण - वाशीम कोरोना अपडेट

मालेगाव शहरात एकाच दिवशी 80 व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मालेगाव नगर पंचायतच्या वतीने शहरातील प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून बाधीत रुग्णाचा परिसर सील केला आहे.

In a single day, 80 traders were infected with corona in Malegaon
मालेगाव शहरात एकाच दिवशी 80 व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण

By

Published : Mar 6, 2021, 10:35 PM IST

वाशीम - जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून, मागील दहा दिवसांपासून कोरोनाचा आकडा दोन हजारावर गेला आहे. वाशिम जिल्ह्यातील व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्याने दिल्यानंतर शुक्रवारी मालेगाव तालुक्यातील व्यापाऱ्यांची चाचणी केली गेली. या चाचणीत 80 व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे मालेगाव करांची चिंता वाढली आहे.

मालेगाव नगर पंचायतच्या वतीने शहरातील प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून बाधीत रुग्णाचा परिसर सील केला आहे. आरोग्य विभाग सतर्क झाला असून, रुग्णाच्या संपर्कातील नागरिकांच्या तपासणीला सुरुवात केली आहे.

मालेगाव येथील मालेगाव शहरातील नगरपंचायत जवळील ४, गांधी चौक येथील ३, माळी वेताळ येथील ४, शिक्षक कॉलनी येथील ३, शिव चौक येथील १, देशपांडे प्लॉट येथील ३, वार्ड क्र. १० येथील ३, वार्ड क्र. १६ येथील १, गांधी नगर येथील ५, जाटगल्ली येथील १, वार्ड क्र. ८ येथील १, कोर्टासमोरील परिसरातील १, गोकुळधाम येथील १, टिपू सुलतान चौक येथील १, वार्ड क्र. १ येथील १, शेलू फाटा येथील २, अकोला फाटा येथील ५, माहेश्वरी भवन येथील १, बियाणी नगर येथील १, दुर्गा चौक येथील ५, पांडे वेताळ येथील १, तेली वेताळ येथील १, मुंगसाजी नगर येथील १, सोनारगल्ली येथील २, सिद्धेश्वर कॉलनी येथील १, गीता नगर येथील १, स्वामी समर्थ मंदिर परिसरातील १, पाण्याची टाकीजवळील १, मर्कस मस्जिद जवळील १, दत्त मंदिर जवळील १, वार्ड क्र. ४ येथील १, सहारा पार्क येथील २, सराफा गल्ली येथील १, वार्ड क्र. १७ येथील १, महसूल कॉलनी येथील १, जामा मस्जिद परिसरातील १, गणपती मंदिर परिसरातील १, गोयंका नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे १८ असे एकूण 114 कोरोना रुग्ण आढळले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details