वाशिम - जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील किनखेडा गावालगत वाहत असलेल्या पैनगंगा नदी पात्रातील रेती घाटांवरुन नियमांना तिलांजली देत बेसुमार रेती उपसा केला जात आहे. महसूल प्रशासन या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे लाखो रुपयांची गौण खनिजाची माफिया लूट करीत आहेत.
माफियांकडून अवैधरित्या रेती उपसा; महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष - वाशिम अवैध रेती उपसा
महसूल प्रशासन या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे लाखो रुपयांची गौण खनिजाची माफिया लूट करीत आहेत.
माफियांकडून अवैधरित्या रेती उपसा; महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष
पैनगंगा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेती उपसा केला जात आहे. रेती घाटाचे लिलाव झाले नसून लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. मात्र, या प्रकाराकडे महसूल विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.