महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक ! अवैध दारू विक्रेत्याकडून दारूबंदी समितीच्या महिला अध्यक्षाला मारहाण - दारूबंदी

वाशिम जिल्ह्यातील कारंजा-लाड तालुक्यात अवैध दारू विक्रेत्याने दारूबंदी समितीच्या महिला अध्यक्षाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना २१ जुलै रोजी घडली आहे.

अवैध दारू विक्रेत्याकडून दारूबंदी समितीच्या महिला अध्यक्षाला मारहाण

By

Published : Jul 22, 2019, 7:39 PM IST

वाशिम - वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यात अवैध दारू विक्रेत्याने महिलेस मारहाण केल्याची घटना २१ जुलै रोजी घडली आहे. धनज पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या कुपटी गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. लक्ष्मीबाई जाधव असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांच्यावर कामरगाव ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करुन पुढील उपचारासाठी अमरावतीत हालविण्यात आले आहे .

कारंजा तालुक्यातील कुपटी येथे अवैध देशी दारू विक्री केली जात होती. यामुळे कुपटी येथील महिलांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर होते. तसेच काही युवक व्यसनाधीन झाल्याने गावांमध्ये तंटे वाढले होते. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कुपटी येथील महिलांनी दारूबंदीचा ठराव केला. मात्र, २१ जुलै रोजी विक्रेत्याने पुन्हा दारूची विक्री सुरू केल्याची माहिती दारूबंदी समितीच्या अध्यक्षा लक्ष्मीबाई जाधव यांना मिळाली. संबंधित माहिती कळताच त्यांनी दारू विक्रेत्यास हटकले. यानंतर विक्रेत्याने महिला अध्यक्षाला मारहाण करण्यास सुरूवात केली. ही बाब काही महिला सदस्यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन विक्रेत्यास चांगलाच चोप दिला. यावेळी दारूविक्री करणारे सचिन ढोके यांचे कुटुंबीय व दारूबंदी समितीच्या महिलांमध्ये वाद निर्माण झाला. यामध्ये दारूबंदी समितीच्या सदस्या गंगुबाई पवार, लक्ष्मी जाधव व रमेश पवार हे जखमी झाले असून, त्यांच्यावर कामरगांव ग्रामीण रुग्णालय येथे उपचार चालू आहेत.

अवैध दारू विक्रेत्याकडून दारूबंदी समितीच्या महिला अध्यक्षाला मारहाण

लक्ष्मीबाई जाधव यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरुन आरोपी ताराबाई ढोके, वत्सल्या ढोके, प्रल्हाद माकोडे याविरुध्द कलम ३२३, ३२४, ५०६, ५०४ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आला आहे. तसेच ताराबाई यांच्या तक्रारीवरुन आरोपी लक्ष्मी जाधव, रमेश पवार, रमेश शिंदे, रंजना खरडे, गंगुबाई पवार, देवराव जाधव याविरोधातही कलम ३२३, ३२४, ५०६, ५०४ नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, धनज पोलीस पुढील तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details