वाशिम जिल्ह्यात चारित्र्याच्या संशयावरून पतींने कुऱ्हाडीने वार करून पत्नीची केली हत्या
चारित्राच्या संशयावरून पतीने पत्नीची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंगरुळपीर तालुक्यातील चोरद गावात रविवारी रात्री एक वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
वाशिम जिल्ह्यात चारित्र्याच्या संशयावरून पतींने कुऱ्हाडीने वार करून पत्नीची केली हत्या
वाशिम - चारित्राच्या संशयावरून पतीने पत्नीची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंगरुळपीर तालुक्यातील चोरद गावात रविवारी रात्री एक वाजताच्या सुमारास ही घटना घडली. शोभा झाटे (वय 40 वर्ष) असे मृत महिलेचे नाव आहे. घटनेची माहिती मंगरुळपीर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. तसेच आरोपी पती विठ्ठल झाटेला अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे.