वाशिम -कोरोनाला रोखण्यासाठी सर्वत्र संचारबंदी लागू आहे. घरा बाहेर पडण्यास मनाई आहे. त्यामुळे महिलाच्या उन्हाळी कामानीं वेग घेतला आहे. बाहेर पडण्याची परवानगी नसल्याने विरंगुळा म्हणून का होईना, केव्हा नव्हे तो पुरुषवर्गही महिलांना या कामात हिरीरीने हातभार लावत आहे.
सर्वत्र सुरू असलेल्या संचारबंदीमुळे घराबाहेरील प्रत्येकाचे कामकाज ठप्प झाले आहे. ग्रामीण भागात शेतीची कामे आटोपल्याने एरव्ही शेतकऱ्यांसह मजूरवर्ग ही निवांत झाला आहे. वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागात महिलांच्या पापड, कुरड्या, लोणची यासह कडधान्याच्या विविध डाळी बनविणे या कामांनी वेग घेतला आहे. अशा वेळी घरात बसून बसून कंटाळलेला पुरुष वर्ग विरंगुळा म्हणून महिलांना या कामात मदत करत आहे.