वाशिम: जिल्ह्यातील रोहना येथील पंतप्रधान ग्राम सडक योजने अंतर्गत सुरू असलेल्या रोडच्या कडेला नाल्या न काढल्यामुळे शेतात पाणी शिरल्याने शेकडो एकर जमीन खरडून गेली आहे. पेरणी करण्यासाठी तयार करण्यात आलेली जमीन खरडून गेल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. संबंधित कंत्राटदारावर कारवाई करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बाधित शेतकरी करीत आहेत.
मुसळधार पावसामुळे रोहना येथील शेकडो एकर जमीन गेली खरडून - वाशिम पाऊस
मानोरा तालुक्यातील रोहना इझारा येथील पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत रोडचे काम सुरू आहे. रोडच्या बाजूला नाल्या न काढल्यामुळे शेतात पाणी शिरल्यामुळे गावातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरून जमीन खरडून गेली आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर जमीन खरडून शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. बाधित शेतकऱ्यांनी मानोरा तहसीलदार यांना निवेदन दिले असून, जिल्हा प्रशासनाने पंचनामा करून संबंधित शेतकऱ्यांवर कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.