महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेततलाव फुटल्याने शेकडो एकरवरील उभे पीक गेले वाहून..जमीनही गेली खरडून - reakdown farm ponds

वाशिम जिल्ह्यातील मसोला येथील शेत तलावाचे काम निकृष्ट झाल्याने पहिल्याचं वर्षी तलाव फूटला. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

शेततलाव फुटल्याने शेतीचे नुकसान

By

Published : Sep 28, 2019, 10:35 AM IST

वाशिम -जिल्ह्यात सिंचनाची सोय व्हावी यासाठी लाखो रुपये खर्च करून कृषी विभागाने यंदा जिल्ह्यात शेततलाव निर्माण केले आहेत.मात्र मंगरुळपीर तालुक्यातील मसोला येथील शेत तलावाच काम नित्कृष्ट दर्जाचे झाले होते. यामुळे पहिल्याचं वर्षी फुटून मसोला गावासह परिसरातील शेकडो एकरवरील उभ्या पिकासह जमीन खरडून गेली आहे.त्यामुळं शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

शेततलाव फुटल्याने शेतीचे नुकसान

मसोला येथे यंदा शेत तलाव बांधण्यात आला,मात्र त्याचं काम चांगल्या दर्जाच झालं नसल्याने फुटला आहे.त्यामुळं आमची शेती पिकासह खरडून गेली असून,सोयाबीन पिकात पाणी साचलय आहे.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी कृषी विभागाला निवेदन दिले असून, शेत तळ्याच्या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून मदत करण्याची मागणी पीडित शेतकऱ्यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details