वाशिम- जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यांमध्ये दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. मात्र, याबद्दल वाशिम जिल्ह्यातील नागरिकांना गांभीर्य नसल्याचे चित्र दिसत आहे. जिल्ह्यातील शिरपूर येथे शिष्यवृत्तीचे पैसे आले, की नाही हे पाहण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी बँकेसमोर मोठी गर्दी केली. यामुळे मुख्य चौकात लांबच-लांब रांगा लागल्याचे दिसून आले.
शिष्यवृत्तीच्या पैशांची चौकशी करण्यासाठी बँकेसमोर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी - शिष्यवृत्तीच्या पैशांची चौकशी करण्यासाठी बँकेसमोर गर्दी
संचारबंदी शिथिलतेमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करता विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली. सुरक्षित अंतर राखण्याच्या नियमाचा फज्जा उडल्याचे दिसून आले आहे.
संचारबंदी शिथिलतेमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करता विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली. सुरक्षित अंतर राखण्याच्या नियमाचा फज्जा उडल्याचे दिसून आले आहे.
शिष्यवृत्तीचे पैसे जमा झालेत की, नाही हे पाहण्यासाठी बरेच विद्यार्थी बँकेत आले होते. त्यातील काहींचे पैसे जमा झालेत, काहींचे झालेले नाहीत. पण, मुले लहान असून त्यांच्यात सुरक्षित अंतराचे गांभीर्य नव्हते. आमच्या काही अधिकाऱ्यांनी त्यांना सुरक्षित अंतर राखण्यास सांगितले होते. पोलिसांना बोलावता आले असते, पण ही लहान मुले होती, असे महाराष्ट्र बँकेचे शिरपूरचे शाखाधिकारी शशिकुमार यांनी सांगितले.