वाशिम -1 मेपासून देशात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर वाशीममध्ये लसीकरण केंद्रावर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावेळी तरुणांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली.
वाशिम येथील लसीकरण केंद्राबाहेर नागरिकांची प्रचंड गर्दी - washim vaccination news
वाशीममध्ये लसीकरण केंद्रावर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावेळी तरुणांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी साधलेल्या संवादामध्ये नागरिकांनी लसीकरण केंद्राबाहेर गर्दी करू नये असे आवाहन केले होते. मात्र, असे असताना देखील वाशिममध्ये प्रचंड गर्दी करण्यात आली आहे. दरम्यान, वाशिम जिल्ह्यात पाचच केंद्रावर लसीकरण सुरू आहे.
वाशिम सामान्य रुग्णालय परिसरातील लसीकरण केंद्रावर कोरोना नियमाचे उल्लंघन होत आहे. येथे लस घेण्यासाठी आलेल्या तरुणांनी एकच गर्दी केली. तसेच लसीकरणासाठी मोठया रांगा लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडवला जात असून, लस घेणाऱ्यांकडून कोरोनाला निमंत्रण देण्यात येत आहे असेच म्हणावे लागेल.