वाशिम- संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सर्वच यंत्रणा जीवापाड मेहनत घेवून काम करत आहेत. यामध्ये पोलीस यंत्रणा दिवसरात्र मेहनत घेऊन कर्तव्य बजावत आहे. अनेक पोलीस कर्मचारी कोरोनाग्रस्त होत आहेत. त्यामुळे हॉटस्पॉटच्या ठिकाणी पोलिसांसाठी सुसज्ज हॉस्पिटलची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती, आज वाशिम येथील पत्रकार परिषदेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
कोरोना हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी पोलिसांसाठी सुसज्ज हॉस्पिटलची व्यवस्था - गृहमंत्री अनिल देशमुख - लेटेस्ट न्यूज इन वाशिम
पोलीस यंत्रणा कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेऊन कर्तव्य बजावत आहे. त्यामुळे अनेक पोलीस कर्मचारी कोरोनाग्रस्त होत आहेत. या पोलिसांसाठी कोरोना हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी सुसज्ज रुग्णालयाची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
राज्यातील विविध कोविड रुग्णालयामध्ये उपचारासाठी सहाय मिळण्यासाठी कोविड हेल्पलाईन सुरू करण्यात आली. तसेच पोलीस महासंचालक कार्यालयाकडून साडेसात लाख मास्क यामध्ये दीड लाख एन -१५, सहा लाख ३ प्ले, १५ हजार लिटर सॅनिटायझर, २२ हजार फेस शिल्ड, ४४ हजार हॅन्डग्लोज व ड्रोनचा समावेश आहे. याची किंमत जवळपास ४ कोटी रुपये इतकी आहे. तरीही आवश्यकता भासल्यास पोलीस कल्याण निधीतून खरेदीचे अधिकार सर्व घटक प्रमुखांना देण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.