महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाशिम येथे मुस्लीम बांधवांकडून ईदनिमित्त पूरग्रस्तांना मदत निधी - eid news in washim

जिल्ह्यातील मालेगाव, रिसोड, कारंजा व मंगरुळपीर येथे ईदगाह मैदानावर व शहरातील विविध भागांतील मशिदींमध्ये मुख्य नमाज अदा करुन ईद साजरी करण्यात आली. तसेच शिरपूर जैन व रिठद येथे नमाजा नंतर मुस्लिम बांधवांकडून पूरग्रस्तांसाठी मदत निधीही गोळा करण्यात आला.

ईद निमित्त पूरग्रस्तांना मदत निधी

By

Published : Aug 12, 2019, 11:26 PM IST

वाशिम- त्याग आणि बलिदानाचे प्रतीक असलेली ‘ईद-उल-अजहा’ (बकरी ईद) आज सोमवारी जिल्ह्यातील मालेगाव, रिसोड, कारंजा व मंगरुळपीर येथे ईदगाह मैदानावर व शहरातील विविध भागांतील मशिदींमध्ये मुख्य नमाज अदा करुन साजरी करण्यात आली. तसेच शिरपूर जैन व रिठद येथे नमाजा नंतर मुस्लिम बांधवांकडून पूरग्रस्तांसाठी मदत निधीही गोळा करण्यात आला.

ईद निमित्त पूरग्रस्तांना मदत निधी
रंगीबेरंगी कपडे परिधान करुन मुस्लीम नागरिकांनी नमाजासाठी सकाळी आठ वाजल्यापासूनच ईदगाह मैदानावर येण्यास सुरुवात केली. ईदगाह परिसरात सामूहिक नमाज सकाळी ९ वाजता अदा करण्यात आली. तत्पूर्वी मशिदींमध्ये सुद्धा मुस्लीम बांधवांनी नमाज अदा केली. यावेळी ईदगाह मैदानावर जाणारे रस्ते गर्दीने भरले होते. त्यामुळे या परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. दरवर्षी प्रमाणे कारंजात कश्यप बंधूच्या वतीने पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details