वाशिम- आज रिसोड, मंगरूळपीर व मालेगावसह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे, काढणी सुरू असलेल्या सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे.
वाशिम: रिसोडसह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस, सायाबीन पिकाला फटका - Heavy rain Mangrulpeer
मुसळधार पावसामुळे शिरपूर, कारंजा, कामरगाव, वाशिमसह अनेक ठिकाणी सोयाबीनचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. अगोदरच सप्टेंबर महिन्यातील सततच्या पावसाने सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले आहे.

मुसळधार पावसामुळे शिरपूर, कारंजा, कामरगाव, वाशिमसह अनेक ठिकाणी सोयाबीनचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. अगोदरच सप्टेंबर महिन्यातील सततच्या पावसाने सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांनतर शेतकऱ्यांनी उर्वरीत सोयाबीनची काढणी सुरू केली असताना आज पावसाने जोरदार तडाखा दिला. पावसामुळे सोयाबीन खराब होण्याच्या शक्यतेने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जाऊन काढणी झालेल्या सोयाबीन पिकाला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.
हेही वाचा-विविध प्रलंबित मागण्यांसाठी वाशिमच्या पोहरादेवीत 'शोले स्टाईल' आंदोलन