महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पूल वाहून गेल्याने चार गावाचा संपर्क तुटला, मानोरा तालुक्यात घटना - पूल वाहून गेला

वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात रात्री जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे मानोरा-कोंडोली रस्त्यावरील अरुणावती नदीवरील पूल वाहून गेला आहे. या घटनेमुळे कोंडोली, एकलारा, असोला, मोहगण पारवा या चार गावाचा संपर्क तुटला आहे.

पूल वाहून गेल्याने चार गावाचा संपर्क तुटला, मानोरा तालुक्यात घटना
पूल वाहून गेल्याने चार गावाचा संपर्क तुटला, मानोरा तालुक्यात घटना

By

Published : Jun 10, 2021, 5:19 PM IST

वाशिम - वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात रात्री जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे मानोरा-कोंडोली रस्त्यावरील अरुणावती नदीवरील पूल वाहून गेला आहे. या घटनेमुळे कोंडोली, एकलारा, असोला, मोहगण पारवा या चार गावाचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, पहिल्याचं पावसात पूर वाहून गेल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन, लवकरात लवकर पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

पूल वाहून गेल्याने चार गावाचा संपर्क तुटला, मानोरा तालुक्यात घटना

चार गावाचा संपर्क तुटला

पूल वाहून गेल्यामुळे या चार गावचा संपर्क तुटला आहे. घटना घडून गेल्यानंतरही खूप वेळ संबंधीत विभागाने कोणतीही दखल घेतलेली नाही. यामुळे चारही गावातील नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला आहे. रोजचे दैनंदिन व्यव्हार या घटनेमुळे खोळंबले आहेत. तसेच कित्येक नागरिक या दुसऱ्या गावातच अडकले आहेत. या सगळ्या परिस्थितीवर नागरिकांकडून पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करून, इथली वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details