कारंजा (वाशिम) - तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार वाशिम जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली. कारंजा तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतात पाणी साचले आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी सुखावला आहे.
वाशिमच्या कारंजात सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पावसाची हजेरी - karanja washim heavy rain
या पावसाने पेरणीच्या कामाला वेग येणार आहे. पावसाच्या हजेरीने कृषी सेवा केंद्रांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी पाहायला मिळाली. सकाळपासून पावसाच्या सरी अनेक भागात कोसळल्या. सतत येणाऱ्या पावसाने जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी लागवडीला प्रारंभ केला आहे.
या पावसाने पेरणीच्या कामाला वेग येणार आहे. पावसाच्या हजेरीने कृषी सेवा केंद्रांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी पहायला मिळाली. सकाळपासून पावसाच्या सरी अनेक भागात कोसळल्या. सतत येणाऱ्या पावसाने जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी लागवडीला प्रारंभ केला आहे. मात्र, कृषी विभागाने 100 मिमी पावसानंतरच पेरणीला सुरुवात करावी, असे म्हटले आहे.
काडी कचरा वेचणे, वखरण करणे ही कामे शेतकऱ्यांनी हाती घेतली आहे. पेरणीसाठी रान तयार करून बी-बियाण्यांची व्यवस्था करण्यासाठी सुरुवात केली आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांना अजूनही पीक कर्जाची प्रतिक्षा आहे.