वाशिम -जिल्ह्यात मागील दोन दिवसांत जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक नदी नाल्याला पूर आला होता. काल सायंकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्याने पूर ओसरत आहे. मात्र काल आलेल्या पुरामुळे मानोरा तालुक्यातील कोंडोली येथील अरुणावती नदीवरील पूल पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे कोंडोली, हिवरा, पारवा, असोला खुर्द आणि मोहगव्हान या गावाचा मानोरा शहराशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने पर्यायी मार्ग काढावा, अशी मागणी या गावातील नागरिक करत आहेत.
Washim Rain: अरुणावती नदीवरील पूल वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला - वाशिम पाऊस बातमी
कोंडोली येथील अरुणावती नदीवरील पूल पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे कोंडोली, हिवरा, पारवा, असोला खुर्द आणि मोहगव्हान या गावाचा मानोरा शहराशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने पर्यायी मार्ग काढावा, अशी मागणी या गावातील नागरिक करत आहेत.
वाशिम पाऊस
Last Updated : Jul 23, 2021, 5:00 PM IST