महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाशिममध्ये अवकाळी पावसाची हजेरी, पिकांचे नुकसान - वाशिम जिल्हा बातमी

या अवकाळी पावसामुळे शेलगाव घुगे येथील प्रवीण तुकाराम घुगे यांच्या शेतातील सुमारे 250 झाडाचे नुकसान झाले आहे. अगोदरच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बागेला खरेदीदार मिळत नव्हता तेवढ्यात अवकाळी पाऊस पडल्याने या शेतकऱ्याबरोबरच इतर शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

heavy Rain in Washim
वाशिममध्ये अवकाळी पावसाची हजेरी

By

Published : Apr 1, 2020, 5:32 PM IST

वाशिम- कोरोनाच्या संकटामुळे अवघे जग चिंतेत सापडले असताना, वाशिममध्ये अवकाळी पाऊस डोकावत जात आहे. या अवकाळी पावसामुळे संत्रा बागेचे मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या अवकाळी पावसामुळे शेलगाव घुगे येथील प्रवीण तुकाराम घुगे यांच्या शेतातील सुमारे 250 झाडाचे नुकसान झाले आहे. अगोदरच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बागेला खरेदीदार मिळत नव्हता, तेवढ्यात अवकाळी पाऊस पडल्याने या शेतकऱ्याबरोबरच इतर शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी सरकारकडे अर्ज केला आहे.

गेल्या वर्षात सततच्या दुष्काळामुळे वाशिम जिल्ह्यात पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी संत्रा बागेला टँकरने पाणी देण्याची वेळ आली होती. तर आता अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details