महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परतीच्या पावसाने वाशिम जिल्ह्याला झोडपले; रिसोडमध्ये घर आणि दुकानात शिरले पाणी - वाशिम परतीचा पाऊस

रविवारी मध्यरात्री वेगवेगळ्या भागात पावसाने जोरदार बॅटींग केली. रिसोडमध्ये मुसळधार पाऊस बरसल्याने सिव्हील लाईन परिसरातील अनेक घर आणि दुकानात पाणी शिरले होते.

परतीच्या पावसाने वाशिम जिल्ह्याला झोडपले; रिसोडमध्ये घर आणि दुकानात पाणी शिरले

By

Published : Oct 28, 2019, 12:55 PM IST

Updated : Oct 28, 2019, 3:13 PM IST

वाशिम - जिल्ह्याच्या विविध भागात रविवारी मध्यरात्री मुसळधार पाऊस पडला. पावसाळ्याच्या सुरुवातीला प्रतीक्षा करायला लावणारा पाऊस परतीच्या प्रवासात मात्र जोरदार बरसत आहे. या पावसामुळे रिसोड शहरातील अनेक घर आणि दुकानात पाणी घुसले आहे.

परतीच्या पावसाने वाशिम जिल्ह्याला झोडपले; रिसोडमध्ये घर आणि दुकानात शिरले पाणी

हेही वाचा -आई विना पोरके असलेल्या वासराला दूध पाजते 'कुत्री'

जून, जुलै महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. ऑगस्टनंतर सप्टेंबरमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला होता. परिणामी अनेक लघु मध्यम प्रकल्पातील पाणी पातळी वाढली. रविवारी मध्यरात्री वेगवेगळ्या भागात पावसाने जोरदार बॅटींग केली. रिसोडमध्ये मुसळधार पाऊस बरसल्याने सिव्हील लाईन परिसरातील अनेक घर आणि दुकानात पाणी शिरले होते. त्यामुळे ऐन दिवाळीच्या दिवशी परिसरातील नागरिकांची पाणी बाहेर काढताना चांगलीच तारांबळ झाली. या परतीच्या पावसाचा सोयाबीन काढणीला मोठ्या प्रमाणात फटका बसला.

Last Updated : Oct 28, 2019, 3:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details