वाशिम- रिसोड तालुक्यातील मोप परिसरात मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे शेतात पाणी साचले असून नदी, नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. या पावसामुळे पेरणी केलेल्या शेतात उगवण्यापूर्वीच पीक धोक्यात येण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. पाण्याचा जोर मोठ्या प्रमाणात असल्याने गावात पाणी घुसले असून रस्त्यावर पाणी साचले आहे.
वाशिम : मोप परिसरात मुसळधार पाऊस; ढगफुटी सदृश्य परिस्थिती
मोप परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचले असून नदी, नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. या पावसामुळे पेरणी केलेल्या शेतात उगवण्यापूर्वीच पीक धोक्यात येण्याची शक्यता आहे.
मोप परिसरात झालेला पाऊस
रिसोड तालुक्यातील मोप येथे ढगफुटी सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या शेतकऱ्यांनी शेतात पेरणी केलेली असून शेतकऱ्यांचे मुख्य पीक सोयाबीन, तूर, हळद वाहून गेले आहे. गेल्या तीन दशकापासून असा पाऊस झाला नसल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.
पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे पीक धोक्यात आले आहे. काही ठिकाणी बियाणे वाहून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या गावात शेतकऱ्यांच्या शेतात दोन -तीन फूट पाणी साचले आहे. परिसरातील तीन गावातील शेताचे प्रचंड नुकसान झाले आहे.
Last Updated : Jun 26, 2020, 7:24 PM IST