वाशिम -जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शनिवारी दमदार सुरुवात केल्यामुळे वाशिमकरांमध्ये आनंदाचे चित्र पहायला मिळाले. दिवसभर उकाडा सहन करणारे नागरिक आता सुखावले आहेत तसेच शेतकऱयांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
पंधरा दिवसानंतर वाशिममध्ये पावसाची दमदार हजेरी - रिसोड
पावसाने शनिवारी दमदार सुरुवात केल्यामुळे वाशिमकरांमध्ये आनंदाचे चित्र पहायला मिळाले.शेतकऱयांना दुबार पेरणीच्या संकटापासून दिलासा मिळाला आहे.
पंधरा दिवसानंतर वाशिमला पावसाची दमदार सुरूवात
वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर, मनोरा, रिसोड, मालेगाव, जाऊळका तसेच वाशिम तालुक्यातील वांगी परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. शेतकऱयांना दुबार पेरणीच्या संकटापासून दिलासा मिळाला तर, प्रचंड उकड्यापासून नागरिकांची सुटका झाली आहे.