वाशिम- जिल्ह्यातील धनज परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. विजेच्या कडकडाटासह तीन तास पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. यामुळे परिसरातील सखल भागात पाणी साचले असून या पावसाने काही वेळेसाठी जनजीवन विस्कळीत झाले आहे.
वाशिममध्ये जोरदार पाऊस; नद्या, नाल्यांना पूर - वाशिम पाऊस बातमी
धनज परिसरातील नदी, नाले, दुथडी भरुन वाहत आहेत. पेरणी केलेल्या शेतात पाणी साचल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे, तर नुकतीच पेरणी आटोपलेल्या शेतकऱ्यांचे बीज वाहून जाण्याची शक्यता आहे.
वाशिम जिल्हातील धनजमध्ये जोरदार पाऊस..
धनज परिसरातील नदी, नाले, दुथडी भरून वाहत आहेत. पेरणी केलेल्या शेतात पाणी साचल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे, तर नुकतीच पेरणी आटोपलेल्या शेतकऱ्यांचे बीज वाहून जाण्याची शक्यता आहे. कारंजा तालुक्यातील माळेगाव-सिरसोली-अंबोडा मार्गावरील पुलावरून पाणी वाहत आहे. यामुळे येथील परिसरातील गावाचा संपर्क तुटला आहे. बेंबीला नदीलाही पूर आला आहे.