वाशिम -जिल्ह्यातील रिसोड व मंगरूळपीर तालुक्यासह ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे आंब्यांच्या बागांचे नुकसान होत आहे. बऱ्याच दिवसापासून असलेल्या उन्हाच्या उकड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी, अवकाळी पावसाचा फटका फळपिकांना बसत आहे.
वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; आंबा पिकाचे नुकसान - risod
बऱ्याच दिवसापासून असलेल्या उन्हाच्या उकड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी, अवकाळी पावसाचा फटका फळपिकांना बसत आहे.
वाशीम जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; आंबा पिकाचे नुकसान
या अवकाळी पावसामुळे आंबा पिकाला फटका बसला आहे. त्यामुळे ऐन विक्रीच्या वेळी आंबा गळतीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे महसूल प्रशासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.