वाशिम - एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत जिल्ह्यात पोषण महाअभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, आशा गटप्रवर्तक, आरोग्य सेविका यांची पौष्टिक पोषण आहार बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
पोषण महाअभियाना अंतर्गत पौष्टिक आहार बनवण्याच्या स्पर्धेचे आयोजन - आशा गटप्रवर्तक
बालकांना पौष्टिक आहार मिळावा यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने पौष्टिक पोषण आहार बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जिह्यातील जवळपास दिड हजार महिला कर्मचाऱ्यांनी भाग घेतल्याची माहिती आहे.
0 ते 6 वयोगटातील बालकांना सकस आणि पोषक आहार मिळावा, त्यांचा विविध आजारांपासून बचाव व्हावा, त्यांचा सर्वांगीन विकास व्हावा इत्यादी अनेक बाबींसाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना 1998 पासून काम करत आहे. मात्र, यामध्ये बालकांमधील कुपोषण ही एक मोठी समस्या आहे. या समस्येवर मात करण्यासाठी राज्यभरात पोषण महाअभियान राबवण्यात येत आहे. याअंतर्गत बालकांना पौष्टिक आहार मिळावा यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने पौष्टिक पोषण आहार बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जिह्यातील जवळपास दिड हजार महिला कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. दरम्यान, उत्कृष्ट पोषण आहार बनवणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे.
हेही वाचा -माझ्या काकांनी एका झटक्यात कर्जमाफी केली...अजित पवारांचा विरोधकांना टोला