वाशिम - वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस आहे. तर जिल्ह्यातील शिरपूर, केनवड, चाडस, काटा,कोंडाळा, परिसरात गारपीट झाली आहे.
वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट; पिकाचे नुकसान - washim marathi news
वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले.

वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट
वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट
शेतकऱ्यांवर पुन्हा संकट-
या अवकाळी पावसासह गारपीटमुळे काढणीला आलेल्या हळद, हरबरा,गहू, पिकाचे नुकसान त्यासोबत फळबागांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा संकट आले आहे. जिल्हा प्रशासनाने नुकसान ग्रस्त भागाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करावी अशी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा-महाराष्ट्र कोरोना अपडेट, राज्यात आज 25 हजार 681 रुग्णांची नोंद